शंभर कोटींबाबत शरद पवार, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यासाठी फडणवीसांनी पाठवले पाकिट ः जळगावात अनिल देशमुखांचा दावा

ईडी, सीबीआयपासून सुटका करण्याची देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती ग्वाही : माणसाकरवी पाकिट पाठवल्याचा देशमुखांचा दावा


जळगाव : शंभर कोटी रुपये मागितल्याचा आरोप प्रकरणातील तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगावात केलेल्या धक्कादायक दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा जोरदार खळबळ उडाली. शंभर कोटींबाबत शरद पवार, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करा व तसे प्रतिज्ञापत्र लिहून द्या, तुमच्यामागे ईडी, सीबीआय लागणार नाही, अशी तीन पाकिटे आपल्याकडे एका माणसाकरवी देवेंद्र फडणवीस यांनी पाठवली होती, असा दावा देशमुख यांनी जळगावात केला आहे. या दाव्याने आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.

शंभर कोटी प्रकरणामुळे आले होते अडचणीत
मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी तीन वर्षांपूर्वी राज्याचा गृहमंत्री असताना 100 कोटी रुपये मागितल्याचा आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या माणसाकरवी तीन पाकिटे माझ्याकडे पाठवल्याचे देशमुख यांनी सांगत शरद पवार, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करीत तसे प्रतिज्ञापत्र लिहून द्या व तुमच्यामागे ईडी, सीबीआय लागणार नाही, असा उल्लेख त्या पाकिटात असल्याचा दावा माजी गृहमंत्री देशमुख यांनी काल जळगावात केला. त्याचा पेन ड्राईव्हदेखील असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईतील हॉटेलचालकांकडून खंडणी वसुलीप्रकरणात देशमुख संशयीत असून त्यांना 1 नोव्हेंबर 2021 रोजी अटक करण्यात आली होती.


तत्कालीन आयुक्त परमवीर सिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून हॉटेलचालकांकडून 100 कोटींच्या खंडणी वसुलीसाठी देशमुख दबाब आणत असल्याचा आरोप केला होता व 1 नोव्हेंबर 2021 रोजी देशमुख यांना ईडीने अटक केली होती.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !