भुसावळात बंटी पथरोडच्या वाहनांची जाळपोळ : अज्ञातांविरोधात गुन्हा
भुसावळ : भुसावळातील दुहेरी हत्याकांडातील मुख्य संशयीत बंटी पथरोड याच्या दोन वाहनांना अज्ञातांनी आग लावल्याचा प्रकार 3 जुलैच्या मध्यरात्री घडला होता. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनीच फिर्याद दाखल केली असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञाताविरोधात गुन्हा
हवालदार नितीन दगडू सपकाळे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. शहरातील पुरूषोत्तम नगरातील मनुमाता हॉस्पीटलजवळील रस्त्याच्या कडेला दुहेरी हत्याकांडातील संशयीत बंटी पथरोड याची चारचाकी इको व चारचाकी फोर्ड लावण्यात आल्या होत्या मात्र अज्ञातांनी या वाहनांना सुडबुद्धीने पेटवून दिले. वाहने आगीत पूर्णपणे पेटल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहेत.

