पाणलोट क्षेत्रात धुवाँधार पाऊस : हतनूर धरणाचे दहा दरवाजे उघडले


Heavy rain in catchment area: Ten gates of Hatnoor dam opened भुसावळ : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानंतर धरणात पाण्याची आवक वाढताच हतनूर धरणाचे 10 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहे. यामुळे धरणातून 19,105 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे तापी नदीला पूर आला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मध्यप्रदेशात मुसळधार पाऊस
मध्य प्रदेशात आणि विदर्भातील अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे त्यामुळे तापी- पूर्णा नदीला पूर आला असून, हतनूर धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने सोमवारी धरणाचे 10 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले आहे.

तापी नदीपात्रात 19 हजार 105 क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने धरण प्रशासनाने नदी पात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याचबरोबर जनावरांनाही नदी पात्रात सोडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !