अश्लील हावभाव करीत महिलेचा विनयभंग : दोघांविरोधात गुन्हा


जळगाव : अश्लिल हावभाव करत महिलेचा विनयभंग केल्याची घटना शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवार, 12 रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास घडली. वाईट नजरेने पाहत संशयिताने अश्लिल शिवीगाळ करुन वीट हातात घेवून महिलेच्या अंगावर धावून आला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार या प्रकरणी रमेश सपकाळे ( वय 35), गंगाधर सपकाळे या संशयितांविरुध्द गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस नाईक योगेश जाधव करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !