अमेरिका हादरली : माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार : हल्लेखोर ठार


वॉशिंग्टन : अमेरिकेत 52 वर्षांनंतर राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारावर हल्ला झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्लेखोराने गोळीबार केला मात्र या हल्ल्यात ट्रम्प बचावले असून हल्लेखोर मात्र ठार झाला आहे. पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे एका रॅलीत ट्रम्प मंचावर बोलत असताना गोळी झाडण्यात आली मात्र ट्रम्प खाली वाकल्याने बचावले.

ट्रम्प हल्ल्यात बचावले
सुरक्षा रक्षकांनी डोनाल्ड ट्रम्प यांना उभे राहण्यास मदत केली तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर आणि कानावर रक्त दिसत होते. यावेळी ट्रम्प यांनी आपली मुठ घट्ट धरली आणि ती हवेत हलवली. त्यानंतर गुप्तहेरांनी ट्रम्प यांना स्टेजवरून उतरवून कारच्या मदतीने रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली.



या घटनेविषयी ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागात गोळी लागली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले की, मला कानाजवळ एक आवाज जाणवला, त्यामुळे काहीतरी चुकीचे घडल्याची बाब लगेच माझ्या लक्षात आली. खूप रक्तस्त्राव झाला. त्यानंतर काय घडले ते कळाले.

52 वर्षांनंतर राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावर हल्ला
अमेरिकेत 52 वर्षांनंतर राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारावर हल्ला झाला आहे. यापूर्वी 1972 मध्ये जॉर्ज सी वॉलेस यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती. ते राष्ट्रपतीपदाचे उमेदवारही होते. एका शॉपिंग सेंटरमध्ये त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यानंतर ते मरेपर्यंत व्हील चेअरवरच राहिले.

यापूर्वी 1972 मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचे भाऊ रॉबर्ट एफ केनेडी यांच्यावर हल्ला झाला होता. लॉस एंजेलिसमधील निवडणूक प्रचार आटोपून ते परतत होते.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !