मोहराळा येथे अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले


यावल : यावल तालुक्यातील मोहराळा येथे शुक्रवारी महसुलच्या गस्ती पथकाने अवैद्य गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले. थोरगव्हाण येथील ट्रॅक्टर मालक ट्रॉलीत एक ब्रास वाळूची वाहतूक करीत असताना परवाना नसल्यानेे पंचनामा करून ट्रॅक्टर व ट्रॉली तहसील कार्यालयात जमा करण्यात आली. ट्रॅक्टर मालकास दंडाची नोटीस बजावण्यात आली.

कारवाईने उडाली खळबळ
यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसुलचे गस्ती पथक मोेहराळा, ता.यावल या गावात गस्तीवर होते. येथे त्यांना स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच 19 बी.जी.8840) हे अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करतांना आढळले. ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास वाळू होती. पथकाने ट्रॅक्टर मालक शिवाजी पाटील (रा.थोरगव्हाण) यांच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला मात्र त्यांच्याकडेे परवाना नसल्याने घटनास्थळी पंचनामा करीत गस्ती पथकातील मोहराळा तलाठी मोहराळा कुर्शाद तडवी, मंडळाधिकारी ए.वाय.बडगुजर, तलाठी ईश्वर कोळी, तलाठी हेमंत मारोडे, उमेश बाभूळकर, तलाठी प्राजक्ता पाटील, तलाठी सुनील कुंभार यांनी ट्रॅक्टर व ट्रॉली यावल तहसील कार्यालयात जमा केली व ट्रॅक्टर मालकास दंडाच्या संदर्भात नोटीस बजावण्यात आली. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !