भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू
अहमदाबाद : ट्रक व लक्झरी बसमध्ये झालेल्या जोरदार धडकेनंतर सहा जणांचा मृत्यू ओढवला तर आठ जण गंभीर जखमी झाले. गुजरातमधील आणंदजवळ अहमदाबाद-वडोदरा एक्सप्रेस हायवेवर हा अपघात घडला. महाराष्ट्रातून राजस्थानला जाणार्या बसला मागून धडक बसल्याने अपघात झाला.
राजस्थानला जात होती बस
लक्झरी बस महाराष्ट्रातून राजस्थानला जात होती. पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना आणंद जिल्ह्यातील विविध रुग्णालयात दाखल केलं. तर इतर जखमींचीही प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानला जाणार्या बसचा टायर पंक्चर झाल्याने ती महामार्गाच्या बाजूला उभी होती. बस चालक, क्लीनर आणि प्रवासी बसच्या बाहेर येऊन उभे होते. त्याच दरम्यान मागून येणार्या ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले.
VIDEO | Gujarat: At least five people lost their lives after a bus collided with a truck on the Ahmedabad-Vadodra Express Highway in Anand, last night.
( Full video available on PTI Videos- https://t.co/dv5TRARJn4) pic.twitter.com/kNkmR9nr26
— Press Trust of India (@PTI_News) July 15, 2024