कोर्‍हाळा शेत-शिवारात वीज पडून माय-लेक जखमी : सुदैवाने टळली प्राणहानी


कुर्‍हाकाकोडा : मुक्ताईनगर तालुक्यातील कोर्‍हाळा-रिगांव शेती शिवारात वीज कोसळल्याने रिगांव येथील मायलेक जखमी झाले. कुर्‍हाकाकोडा परिसरात मंगळवारी दुपारी तीन साडेतीन वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. कोर्‍हाळा शिवारात शेतात रिगांव येथील शोभाबाई साहेबराव बेलदार (55) आणि त्यांचा मुलगा गोकुळ साहेबराव बेलदार (27) हे मायलेक गट नंबर 173 मध्ये स्वतःच्या शेतात काम करीत असताना पावसामुळे निंबाच्या झाडाखाली आश्रयाला आल्यानंतर काही वेळेत झाडावर वीज कोसळली. विजेचा धक्का दोन्ही माय-लेकांना बसल्याने ते खाली कोसळून बेशुद्ध झाले.

वेळीच उपचारार्थ हलवले
थोड्या वेळानंतर शुद्धीवर असलेल्या गोकुळने गावात घटनेची माहिती कळवली. घटनास्थळी तत्काळ गावातील तरुण धावून आल्यानंतर जखमींना कुर्‍हा येथे आणण्यात आले व मलकापूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉ.चेतन जाधव यांनी उपचार केले. माजी उपसरपंच अनिल पांडे, रिगांवचे छोटू पाटील, शत्रुघ्न बेलदार, पिंटू बेलदार आदी तरुण मंडळी उपस्थित होती. रिगांव येथील तरुणांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पाऊस सुरू असतांनाच घटनास्थळी धाव घेत जखमींना दवाखान्यात आणले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !