म्हशींच्या पारडूची कंटेनरमधून कत्तलीसाठी अवैध वाहतूक : हरियाणातील तिघांना रावेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या


रावेर : रावेर तालुक्यातील पाल खरगोन रस्त्यावर कत्तलीसाठी अवैधरित्या मुर्‍हा जातीच्या नर व मादीच्या 49 म्हशींच्या पारडूची ट्रालात कोंबून वाहतूक केली जात असताना रावेर पोलिसांनी जनावरांची सुटका करीत तीन जणांना अटक केली.

तिघांविरोधात गुन्हा
शुक्रवारी मध्यरात्रीनंतर खरगोनकडून पाल येथील शेरी नाक्या जवळ टाटा कंपनीचा कंटेनर (क्रमांक आर.जे.11 जी.सी.5697) ची रावेर पोलिसांनी तपासी केल्यानंतर त्यात चार लाख 90 हजार किंमतीचे मुर्‍हा नर जातीचे दोन ते तीन वर्षांचे म्हशीचे 45 पारडू तसेच दोन ते तीन वर्षाच्या चार मादी जातीचे म्हशीचे पारडू कंटेनरमध्ये चारा पाण्याची सोय न करता वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय दोरीने जखडून बांधून निर्दयतेने कत्तल करण्याच्या उद्देशाने अवैध वाहतूक करतांना आढळले. याप्रकरणी पोलिसांनी 15 लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा कंटेनर जप्त केला. याबाबत पोलीस कॉस्टेबल मुकेश मेढे यांनी रावेर पोलिसात दिलेल्या माहितीवरून जमशेद ईस्माईल खान, पचनाका (हरियाणा), इरफान (हरियाणा), शकीब खान सोहाबखान, पचनाका (हरियाणा) यांना अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉस्टेबल विष्णू भील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !