चाळीसगावच्या प्रा.डॉ.सुनीता कावळे यांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

हिंदी भाषा प्रसार व साहित्य लेखन योगदासाठी झाला सन्मान


चाळीसगाव : चाळीसगाव महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या प्रमुख व पीएचडीच्या मार्गदर्शक प्रा.डॉ. सुनीता नारायणराव कावळे यांना स्व. सतपाल राठोड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नुकताच उत्तर प्रदेशातील बदायूँ येथे आयोजित राष्ट्रीय सोहळ्यात राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. हिंदी भाषा प्रसारासह साहित्य लेखन आदि उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. सोहळ्याचे आयोजन हरिप्रताप राठोड यांनी तर संजोजन पल्लवी शर्मा यांनी केले होते. कावळे यांना यापूर्वीही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या सन्मानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !