नेपाळच्या काठमांडूत टेकऑफनंतर विमान क्रॅश : 18 प्रवाशांचा मृत्यू


नवी दिल्ली : टेकऑफनंतर विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल 18 कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. नेपाळची राजधानी काठमांडू येथे पोखराकडे निघालेले विमान टेकऑफनंतर क्रॅश झाले. बुधवारी सकाळी 11 वाजता त्रिभुवन विमानतळावरून विमानाने उड्डाण केले. काही क्षणातच ते कोसळले. मयतांमध्ये 17 सूर्या एअरलाइन्सचे कर्मचारी होते तर उर्वरित 2 क्रू मेंबर्स होते.

अपघातानंतर विमानाला लागली आग
काठमांडू पोस्टनुसार, अपघातानंतर लगेचच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, एका सुरक्षा अधिकार्‍याने सांगितले की, अपघातानंतर विमानाला आग लागली. ते लगेचच विझवण्यात आले.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी काठमांडू पोस्टशी बोलताना सांगितले की, विमान धावपट्टीच्या दक्षिणेकडून उड्डाण करत होते. अचानक त्याला धक्का बसला आणि आग लागली. यानंतर ते पूर्वेकडील बुद्ध एअर हँगर आणि रडार स्टेशनच्या मध्यभागी असलेल्या एका खड्ड्यात कोसळले.


कॉपी करू नका.