भुसावळात गळा आवळून खून झालेल्या ‘त्या’ बालकाची ओळख पटली


The identity of ‘that’ child who was strangulated in Bhusawal has been identified भुसावळ : भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील नवोदय विद्यालयामागील शेतात 10 ते 12 वर्षीय अल्पवयीन बालकाचा नग्न अवस्थेतील कुजलेला मृतदेह गुरुवार, 18 रोजी सकाळी आढळला होता. शवविच्छेदन अहवालाअंती अज्ञाताविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अखेर पटली बालकाची ओळख
भुसावळ तालुका पोलिसांकडून बालकाची ओळख पटवण्याचे आवाहन माध्यमातून करण्यात आल्यानंतर बुधवार, 24 रोजी बालकाची ओळख पटवण्यात यंत्रणेला यश आले आहे. अनिल कैलास आव्हाड (11, रेल्वे लोखंडी पुलाजवळ, भुसावळ) असे खुन झालेल्या बालकाचे नाव आहे. अनिल हा आपल्या परिवारासह स्टेशन परिसरात भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करीत होता मात्र या बालकाचा खून कुणी व का केला? याचा शोध घेण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे. 12 वर्षीय बालकाची गळा आवळून हत्या करण्यात आली व मृतदेहाजवळ त्याचे कपडे फेकून संशयीत पसार झाला होता व मृतदेह कुजल्याने पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड करीत आहेत.


कॉपी करू नका.