निमगावजवळ दुचाकी अपघातात वड्री धरणावरील दोघे जखमी


Two people on Vadri dam injured in a two-wheeler accident near Nimgaon यावल : यावल तालुक्यातील निमगावजवळ यावलकडून भुसावळकडे जातांना दुचाकी घसरून अपघात घडला. यात वड्री धरण वस्तीवरील दोघे जखमी झाले. हा अपघात गुरुवारी दुपारी घडला. जखमींना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास जळगाव हलवण्यात आले आहे.

एकाची प्रकृती गंभीर
यावलकडून भुसावळ जाणार्‍या रस्त्यावरील निमगावजवळ दुचाकीव्दारे सुनील पावरा (35) व दारासिंग पावरा (40 दोघं रा.वड्री धरण वस्ती) हे जात असताना त्यांची दुचाकी घसरली व अपघात घडला. यात दोेघे जखमी झाले. त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आणल्यानंतर डॉ.सौरभ भुताने, डॉ.शबाना तडवी, अधिपरिचारीका माधुरी ठोके, जॉन्सन सोरटे, अमोल अडकमोल आदींनी त्यांच्यावर उपचार केले. यातील दारासिंग पावरा याच्या डाव्या पायाला जबर दुखापत असून त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.


कॉपी करू नका.