भुसावळात भरधाव बल्करने उडवल्याने सेवानिवृत्त रेल्वे कर्मचार्याचा मृत्यू
अपघाताने महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प
Retired railway employee dies after overrunning bulker blows up in Bhusawal भुसावळ : राष्ट्रीय महामार्गावर जळगावकडून दीपनगरकडे भरधाव वेगात जात असलेल्या बल्करने पादचार्याला दिलेल्या जबर धडकेत पादचार्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची घटना शुक्रवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात प्रमोदकुमार चंद्रकांत प्रसाद पांडे (65) यांचा मृत्यू झाला. पांडे हे रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. अपघातानंतर बल्कर चालक पसार झाला.
अपघातानंतर वाहन चालक पसार
शुक्रवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास जळगावकडून दीपनगरकडे वेगात जात असलेले बल्कर (एम.एच.20 ई.जी.7491) ने चाहेल ढाब्याच्या मागे असलेल्या शिवदत्त नगरातील रहिवासी व निवृत्त रेल्वे कर्मचारी प्रमोदकुमार चंद्रकांत प्रसाद पांडे (65) यांना महामार्गावर पायी चालत असताना धडक दिली. अपघातात पांडे यांचा जागीच मृत्यू झाला. बल्करने महामार्गालगतच्या टपरीला सुध्दा जबर धडक दिली. अपघात होताच महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाली. मृत पांडे यांचा मृतदेह मृतदेह ट्रामा केअर सेंटरला हलवण्यात आाल. अपघातानंतर त्यांचा मुलगा घटनास्थळी दाखल झाला व वडिलांचा मृतदेह पाहताच त्याने आक्रोश केला. यावेळी बाजारपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी वाहतूक कोंडी दूर केली. अपघातानंतर बल्कर चालक मात्र पसार झाला.

