जळगावात घरफोडी : रेकॉर्डवरील कुविख्यात आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात


जळगाव : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी घरफोडी प्रकरणी दोन सराईत आरोपींना शुक्रवारी सकाळी 10 वाजता एमआयडीसी पोलीस हद्दीतून अटक केली. आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरातील सदगुरू नगरात जयश्री मयुर वाणी रा. सदगुरू नगर, जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. याच परिसरात त्यांच्या आईचे घर देखील आहे. 22 जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी जयश्री वाणी यांच्या आईचे घर उघडून घरातून 15 हजारांची रोकड आणि चांदीच्या वस्तू असा मुद्देमाल चोरी केली होती. याप्रकरणी 23 जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रेकॉर्डवरील गुन्हेगार जाळ्यात
घरफोडी रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत पंडीत साबळे उर्फ चोर बाप्या आणि दोन महिन्यांपूर्वीच एनपीडीएमधून सुटून आलेला रितेश कृष्णा शिंदे उर्फ चिच्या यांनी मिळून केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार विजय पाटील, हवालदार गणेश शिरसाळे, किशोर पाटील, योगेश बारी, नाना तायडे, किरण पाटील, चंद्रकांत पाटील यांनी दोघांना शुक्रवार, 26 जुलै रोजी सकाळी 10 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली. आरोपींकडून चोरीला गेलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेलेल चोरीची दुचाकी क्रमांक (एम.एच.12 बी.जे.5025) ही जप्त करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !