जळगावातील खून प्रकरणी दोघा आरोपींना सिंधूदुर्ग जिल्ह्यातून अटक
जळगाव : जुन्या वादातून जळगावात किशोर सोनवणे याचा तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. ही घटना 23 मे रोजी घडली होती. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन संशयित आरोपींना रविवार, 28 जुलै रोजी सकाळी 10 वाजता पाठलाग करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात आजवण येथून अटक करण्यात आली. निलेश युवराज सपकाळे (35, रा.शनिपेठ, जळगाव) व अमोल छगन सोनवणे (30, रा.श्रीराम नगर, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
जुन्या वादातून झाला होता खून
जळगाव शहरात कालिका माता मंदिर परिसरात हॉटेल भानू येथे 23 मे 2024 रोजी किशोर सोनवणे या तरूणाचा जुन्या वादातून धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. ही संपुर्ण घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद होती. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेतील दोन संशयित आरोपी निलेश युवराज सपकाळे आणि अमोल छगन सोनवणे हे फरार होते. दरम्यान या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना या खून प्रकरणातील संशयित आरोपी निलेश सपकाळे आणि अमोल सोनवणे हे दोघे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यांमध्ये आजगाव येथे ओळख लपवून राहत असल्याची माहिती मिळाली.

जळगाव पोलिसांनी सावंतवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानुसार सावंतवाडी पोलिसांनी आजगाव येथे जावून जाऊन संशयित आरोपींची माहिती घेतली मात्र कुणकुण लागताच संशयीत हे मालवणच्या दिशेने पसार होत असतांना पोलिसांनी दोघांचा पाठलाग करून अटक केली. सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या कर्मचार्यांनी जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेला माहिती दिली व दोघांना जळगाव एलसीबीच्या ताब्यात देण्यात आले.
