मंगरूळ शिवारातून महावितरणची 16 हजारांची तार लांबवली


रावेर : रावेर तालुक्यातील मंगरूळ शेत-शिवरातून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची दहा गाळ्यातील 16 हजार रुपये किंमतीची अ‍ॅल्युमिनिअम तार चोरट्याने चोरून नेली. याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मंगरूळ शेत-शिवारातील व केर्‍हाळा येथील सुनील मधुकर महाजन यांच्या गट शेती क्रमांक 132/2 (अ) व रामदास धनु गायकवाड यांच्या शेती गट क्रमांक 265 शेती दरम्यान दहा गाळ्यांतील 16 हजार रुपये किंमतीची अ‍ॅल्युमिनियमची तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत वीज कंपनीचे प्रधान तंत्रज्ञ श्याम पवार यांनी रावेर पोलिसात दिलेल्या माहितीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक सुनील वंजारी करीत आहेत .


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !