विमा पॉलिसीच्या आमिषाने रावेर तालुक्यातील प्रौढाला 22 लाखात गंडवले : दिल्लीतील ढगाला बेड्या


An adult in Raver taluk was cheated of 22 lakhs by the lure of an insurance policy: Delhi’s Dhagala in shackles जळगाव : प्रौढाला विमा पॉलिसीचे आमिष दाखवून 22 लाखात गंडवणार्‍या दिल्लीत महाठगाला जळगाव सायबर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

असे आहे फसवणूक प्रकरण
रावेरातील तक्रारदार संजय कुलकर्णी (59) यांना अज्ञात आरोपींची विमा पॉलिसीचे आमिष दाखवून 22 लाखांत गंडवले होते. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला फेब्रुवारी 2024 मध्ये गुन्हा दाखल होता. याप्रकरणी सायबर पोलिसांनी संशयित आरोपी राहुल पाल सुखबीर सिंग (37, रा.अशोक नगर, दिल्ली) याला दिल्लीतून बेड्या ठोकल्या.

आरोपी कारागृहात
संशयित राहुल पाल यास न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायमूर्ती डी.ए. सरनायक यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपीची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वसंत बेलदार, श्रीकांत चव्हाण, ललित नारखेडे, प्रदीप चौधरी, उज्वला माळी यांनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !