यावल शहरात सार्वजनिक बांधकाम उपविभागासमोरील खड्ड्यांमुळे अपघात : तरुण जखमी
Accident due to potholes in front of Public Works Sub-division in Yaval town : Youth injured यावल : यावल शहरातील चोपडा रस्त्यावर असलेल्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाच्या समोर अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावर खड्डा चुकवतांना झालेल्या अपघातात 35 वर्षीय तरुण जखमी झाला. अपघातानंतर त्याला तातडीने उपचारार्थ यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पायाला व डोक्याला जबर दुखापत झाली. हा अपघात शनिवारी दुपारी घडला.
तरुणाच्या पायाला जबर दुखापत
यावल शहरातून अंकलेश्वर बर्हाणपूर राज्य मार्ग मार्गस्त होतो. या राज्य मार्गावर चोपडा रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय आहे. या कार्यालयाच्या समोरच रस्त्यात खड्डा पडला आहे. या रस्त्यावरून शनिवारी दुपारी जावेद मुनाफ पटेल (रा.सुंदर नगरी, यावल) हा तरुण दुचाकी क्रमांक (एम. एच. 19 बी. व्ही. 2993) द्वारे यावल शहरात येत होता. अचानक समोर आलेल्या खड्ड्याला चुकवतांना त्याचा तोल गेला आणि मोटरसायकलसह तो रस्त्यावर कोसळला. यात मोटरसायकलचे नुकसान झाले तसेच जावेद पटेल याला डाव्या पायाला, डोक्याला, चेहर्याला जबर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉ.तुषार सोनवणे, डॉ.कोमल नरवाडे, अधिपरिचारिका मंजुषा कोळेकर, सुमन राऊत, संजय जेधे यांनी तरुणावर उपचार केले. तरुणाच्या पायाला जबर दुखापत झाली.

