भुसावळातील मोटारसायकल चोरटा जळगाव एलसीबीच्या जाळ्यात
चोरी केलेल्या दोन दुचाकी जप्त : गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
Motorcycle thief in Bhusawal in the net of Jalgaon LCB भुसावळ : जळगाव गुन्हे शाखेने भुसावळातील दुचाकी चोरट्याला अटक करीत त्याच्याकडून चोरी केलेल्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. अल्तमस गणी तडवी (24, मुस्लीम कॉलनी, बिस्मिल्ला नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी जळगाव तालुका व अडावद पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केलेली दुचाकी काढून दिली असून याबाबत गुन्हादेखील दाखल आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जळगाव गुन्हे शाखा निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कमलाकर बागुल, हवालदार गोपाळ गव्हाळे, नाईक रणजीत जाधव, कॉन्स्टेबल सचिन पोळ आदींच्या पथकाने केली.

