भुसावळात दुकाने निरीक्षकांच्या कार्यालयातून लोखंडी कपाटासह साहित्याची चोरी


Theft of material including an iron cupboard from the office of Inspector of Shops in Bhusawal भुसावळ (7 ऑगस्ट 2024) : भुसावळ शहरातील जुन्या पालिकेच्या ईमारतीसमोर असलेल्या दुकाने निरीक्षकांच्या गाळ्यातून चोरट्यांनी लोखंडी कपाटासह महत्त्वाच्या नोंदी लांबवल्याचा धक्कादायक प्रकार 16 जुलै 2024 पूर्वी घडला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात मंगळवार, 6 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

पालिका गाळ्यातून लांबवले साहित्य
शहरातील बसस्थानकाजवळ जुनी पालिकेची ईमारत आहे. या इमारतीच्या मंदिरासमोर दुकाने निरीक्षक यांचे कार्यालय आहे. कार्यालय बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी 400 रुपये किंमतीचे लोखंडी कपाट, आठशे रुपये किंमतीच्या खुर्च्या, 45 ते 50 दुकाने नोंदवही, एक ते दोन पथिकाश्रम, चार ते पाच हॉटेल आस्थापना नोंदवही तसेच जुने रेकॉर्ड मिळून दोन हजारांचे साहित्य लंपास केले. हा प्रकार 16 जुलै रोजी सकाळी 10 वाजेच्या पूर्वी घडला. मंगळवार, 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दुकाने निरीक्षक जगदीश कौतीक पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नेरकर करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !