फैजपूरात पालिका सभागृहात चोरी : आरोपी जाळ्यात
फैजपूर (11 ऑगस्ट 2024) : शहरातील महात्मा गांधी सभागृहातील दरवाजे खिडक्यांची चोरी ः प्रशासन बेदखल या आशयाचे वृत्त 10 ऑगस्ट रोजी ‘दैनिक तरुण भारत’ने प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने दखल घेत या संदर्भात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल केला. प्रभारी मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी गुन्हा दाखल करण्याच्या निर्देश दिल्यानंतर फैजपूर पोलिसात तत्काळ गुन्हा नोंद करण्यात आला व पोलीस प्रशासनानेदेखील अवघ्या तीन तासात आरोपीला अटक केली.
शहरात नगरपालिका मालमत्तेची व सार्वजनिक मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर
दिवसा ढवळ्या चोरी सुरू आहे तर समाजकंटकांकडून या मालमत्तेचे तोडफोड करून मोठे नुकसान केले जात आहे. नगरपालिका व पोलीस प्रशासनाने शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

