शिरागड ते पथराडे रस्त्यावर दुचाकीस दुचाकीची धडक : 33 वर्षीय तरुण जखमी


यावल (12 ऑगस्ट 2024) : शिरागड ते पथराडे रस्त्यावर 33 वर्षीय तरुणाच्या दुचाकीला अन्य दुचाकी चालकाने धडक देत पळ काढला. अपघातात 33 तरुण हा गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

शिरागड ते पथराडे रस्त्यावरून 27 जुलै रोजी सकाळी अनिल गुलाब सोळुंके (33, शिरागड) हे शिरागड-पथराडे रस्त्यावरून दुचाकी (क्रमांक एम.एच.19 सी.ई. 6121) द्वारे जात असताना समोरून आलेल्या दुचाकी (क्रमांक जी.जे. 05 एच. डब्ल्यू. 6647) वरील हेमराज प्रेमराज बाविस्कर उर्फ मंड्या यांनी जबर धडक दिली व अपघातानंतर दुचाकी त्याच ठिकाणी सोडून ते पसार झाले. या अपघातामध्ये अनिल सोळुंके यांच्या हाताला फॅक्चर झाले तर छातीला मार लागला आणि उजव्या पायाला मार लागला. जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात व नंतर खडके हॉस्पिटल, जळगाव येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी यावल पोलीस ठाण्यात रविवारी चालक हेमराज बाविस्कर उर्फ मंड्या यांच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अर्जुन सोनवणे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !