भुसावळ शहरातील साईचंद्र नगरातून चोरट्यांनी दुचाकी लांबवली


The thieves stole the bike from Saichandra Nagar in Bhusawal city भुसावळ (13 ऑगस्ट 2024) : शहरात दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यंत्रणेला अद्यापही यश आले नसल्याने दुचाकीस्वार धास्तावले आहे. दररोज शहरासह ग्रामीण भागातून दुचाकींची चोरी कायम होत आहे. शहरातील यावल रस्त्यावरील साईचंद्र नगरातूनही नुकतीच चोरट्यांनी दुचाकी लांबवली. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरात दुचाकी चोरटे सुसाट
राहुल भागवत मेढे (साईचंद्र नगर, भुसावळ) हा तरुण खाजगी काम करून आपला उदरनिर्वाह करतो. कामावर जाण्यासाठी त्याच्याकडे असलेली दुचाकी (एम.एच.19 डी.बी.5313) ही घराबाहेर लावल्यानंतर चोरट्यांनी संधी साधली. चोरीची ही घटना 28 रोजी रात्री साडेआठ ते 29 जुलै 2024 रोजी पहाटे सहादरम्यान घडली. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकीचा तपास न लागल्याने शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक जाकीर मन्सुरी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !