वरणगाव-तळवेल रेल्वे लाईनीवर 35 वर्षीय अनोळखी युवकाचा मृत्यू
वरणगाव (15 ऑगस्ट 2024) : वरणगाव-तळवेल रेल्वे लाईन खांबा नंबर 458 / 09, 07 च्या दरम्यान कुठल्याही धावत्या रेल्वेखाली आल्याने 35 वर्षीय अनोळखी युवकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार, 12 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
अनोळखी मयताच्या मृतदेहाचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले व मृतदेह राखून ठेवण्यात आला. उप स्टेशन प्रबंधक सतीश कुमार यांच्या खबरीवरून वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार प्रमोद कंखरे करीत आहे.

