जळगाव गुन्हे शाखेची मोठी कारवाई : चोरीच्या 14 दुचाकींसह सहा ऑटो रिक्षा जप्त


Big operation of Jalgaon Crime Branch : Six auto rickshaws along with 14 stolen two-wheelers seized जळगाव (20 ऑगस्ट 2024) : जळगाव गुन्हे शाखेने त्रिकूटाकडून चोरीच्या 14 दुचाकी व सहा ऑटो रिक्षा जप्त केल्या आहेत. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील एका संशयीताला चोरीचे वाहन वापरताना कारवाई करण्यात आल्यानंतर आरोपींचे कारनामे समोर आले.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यातील मोटरसायकल धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे आरोपी चालवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथक तयार केले. पाळधीतील शनीनगर स्टेशन रोड भागात संशयित आरोपी मुस्तकीन अजीज पटेल (28, शनिनगर, देढ गल्ली, पाळधी) याची कसून चौकशी केली त्याच्यासह अन्य दोन साथीदारांनी मिळून दोन वर्षापूर्वी जळगाव शहरातून मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली. साथीदार आमीन कालू मणियार (39, रा.रंगारी मोहल्ला, पाळधी), जाबीर सलामत शेख (27, इदगांह प्लाट, पाळधी) यांना अटक करण्यात आली.

या शहरातून लांबवल्या दुचाकी
त्रिकूटाने जळगाव, मालेगाव, छत्रपती संभाजी नगर, खारघर नवी मुंबई, जुहू मंबई बारडोली (गुजरात) या तसेच इतर शहरातून मोटार सायकल व ऑटो रिक्षा चोरी करुन वेगवेळ्या इसमांना विक्री केल्याचे सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन पोलीस पथकाने 14 महागड्या मोटारसायकल व सहा ऑटो रिक्षा मिळून 22 लाख 40 हजारांची वाहने जप्त केली. आरोपींना जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !