भुसावळात अल्पवयीन मुलाचा खून : अल्पवयीन संशयीत ताब्यात


Murder of minor in Bhusawal: Minor suspect detained भुसावळ (20 ऑगस्ट 2024) : भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील नवोदय विद्यालयामागील शेतात 12 वर्षीय अल्पवयीन मुलाचा खून करण्यात आला होता. ही घटना गुरुवार, 18 जुलै 2024 रोजी उघडकीस आली होती. पोलिसांच्या तपासात मयत 12 वर्षीय बालक लोखंडी पुलाजवळील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे संशयीत निष्पन्न केला मात्र पोलीस मागावर असल्याची माहिती कळताच संशयीत पसार झाला. तब्बल महिनाभरानंतर संशयीतास पकडण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे. ताब्यात घेण्यात आलेला संशयीतदेखील अल्पवयीन आहे. शिव्या दिल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.

गळा आवळून केला खून
मयत अल्पवयीन हा संशयीताला शिविगाळ करीत असल्याने त्याचा काटा काढण्यासाठी संशयीताने त्याला नवोदय विद्यालयामागील शेतात नेले व तेथे त्याचे कपडे काढून त्याला गळफास दिला. 16 जुलै 2024 रोजी ही घटना घडल्यानंतर संशयीत पसार झाला. दोन दिवसांनी तालुका पोलिसांना कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह साकेगाव शिवारातील नवोदय विद्यालयामागील शेत गट क्रमांक 317/1 मधील दक्षिण बांधालगत 18 जुलै रोजी आढळला होता. सुरूवातीला तालुका पोलिसांनी सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली व नंतर मयताची ओळख पटवली व शवविच्छेदन अहवालात मयताचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्हीवरून उलगडा
मयताच्या कुटूंबियांनी मयत हा 17 वर्षीय संशयीतासोबत बाहेर पडल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी घटनेच्या दिवसाचे शहरातील विविध भागातील फुटेज गोळा केले व त्यातून संशयीत निश्चित झाल्यानंतर त्याचा शोध सुरू केला. रविवारी संशयीताला भुसावळ तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. 12 अल्पवयीन मयत हा सातत्याने शिविगाळ करीत असल्याने त्याचा गळा आवळला, अशी कबुली ताब्यातील संशयीताने दिली आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !