रावेरात दोन ठिकाणी बंद घर फोडले : एक लाख चाळीस हजाराचा ऐवज लंपास
A closed house was broken into at two places in Raver : one lakh forty thousand instead of lumpas रावेर (20 ऑगस्ट 2024) : शहरातील अष्टविनायक नगर व महात्मा फुले चौकात चोरट्यांनी घरफोडी करीत सुमारे सुमारे एक लाख चाळीस हजाराचा ऐवज लांबवण्यात आला. याप्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. रावेर शहरातील अष्टविनायक नगरात योगेश हरी मोरे वास्तव्यास आहेत.
बंद घर चोरट्यांना पर्वणी
शनिवार, 17 रोजी सायंकाळी काही कामानिमित्त ते भुसावळ येथे गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधली. रात्री चोरट्याने त्यांच्या बंद घराचा कुलुप तोडून घरात प्रवेश करीत लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने व रोख दहा हजार मिळून एक लाख सात हजार 420 रुपयांचा ऐवज लांबवला. दुसर्या घटनेत महात्मा फुले चौकातील सचिन नामदेव महाजन यांच्या घरातील कापडामध्ये ठेवलेले 32 हजार चोरट्याने लांबवले. याबाबत योगेश मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले करीत आहेत.

