रावेर वन विभागाने आठ सागवानी दुसर केले जप्त : संशयीत अंधारात पसार
Raver Forest Department seizes eight more teak trees : Doubts spread in the dark रावेर (21 ऑगस्ट 2024) : वन विभागाच्या गस्ती पथकाने आठ सागवानी दुसर जप्त करीत सागवानाची तस्करी रोखली मात्र अंधाराचा फायदा आरोपी पसार झाले. वन विभागाचे गस्ती पथक शासकीय वाहनाने भोकरी ते अहिरवाडी रस्त्याने गस्त करीत असताना तीन अज्ञात इसम सागाची दुसर घेऊन जाताना दिसले. त्यांचा पाठलाग केल्यानंतर त्यांनी सागाची दुसर फेकत पळ काढला. बाजारभावाप्रमाणे आठ सागाची किंमत दोन हजार 800 रुपये आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे वनसंरक्षक निनु सोमराज, यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे, वनीकरण व सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल अजय बावणे, अहिरवाडी वनपाल राजेंद्र सरदार, पाडळे वनरक्षक सुपडू सपकाळे यांनी केली.

