कर्जोद शिवारात अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला


The decomposed body of unidentified Isma was found in Karjod Shivar रावेर (22 ऑगस्ट 2024) : रावेर तालुक्यातील कर्जोद शेत-शिवारात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. याबाबत रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मयताची ओळख पटवण्याचे आवाहन
कर्जोद येथील शेत-शिवारातील सोनलाल प्रजापती यांच्या शेती गट नं. 290 मधील शेताच्या बाजुला असलेल्या नाल्यात 30 ते 35 वयाच्या तसेच पाच फूट उंची तसेच रंग सावळा, उजव्या पायात काळ्या रंगाची चप्पल, कमरेत काळा करदोडा, मेहंदी रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची पँट अशा वर्णनाचा इसमाचा मृतदेह बुधवारी सकाळी नाल्यातील पाण्यात तरंगतांना व कुजलेल्या अवस्थेत आढळला. संतोष प्रजापती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !