किन्हीतील हर्बल कंपनीतून 14 हजारांचे साहित्य लांबवले


भुसावळ (22 ऑगस्ट 2024) : भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील एमआयडीसीतील सनस्टेम हर्बल कंपनीतून चोरट्यांनी 14 हजार रुपये किंमतीचे साहित्य लांबवले. चोरीची ही घटना 6 ते 7 ऑगस्टदरम्यान घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

14 हजारांचे साहित्य लांबवले
डॉ.स्वप्नील श्रीकांत वढवेकर (40, गणेश कॉलनी, रिंग रोड, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, किन्ही शिवारातील एमआयडीसी भागात प्लॉट नं. एच. 53 मध्ये त्यांची सनस्टेम हर्बल कंपनी आहे. या कंपनीतून पाच हजार रुपये किंमतीचे कॉम्प्रेसर, आठ हजार रुपये किंमतीचा तांब्याचा पार्ट, एक हजार रुपये किंमतीचे टूल किट व सीडी मिळून 14 हजारांचे साहित्य लांबवण्यात आले. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बडगे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !