डोळ्यात मिरची पूड टाकून एक लाख 13 हजार लूटले : जळगावातील घटना


1 lakh 13 thousand looted by putting chilli powder in the eyes: incident in Jalgaon जळगाव (24 ऑगस्ट 2024) : सत्यनारायण सिक्युरीटी फोर्स सुरक्षा एजन्सीच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तीने येऊन डोळ्यात मिरचीची पावडर फेकून रुममध्ये कृष्णकुमार विभूती यांना धक्का देवून ऑफीसमधील सोन्याची चैन, रोख रक्कम व ओप्पो कंपनीचा मोबाईल मिळून एक लाख 13 हजार 15 रुपयांचा ऐवज लांबवला. शहरातील जळगाव-भुसावळ महामार्गावरील कमल पॅराडाईज हॉटेलच्या मागील बाजुस प्रेमचंदनगराजवळ ही घटना घडली.

असे आहे लूट प्रकरण
जळगाव-भुसावळ महामामार्गा कमल पॅराडाईज हॉटेल आहे. या हॉटेलच्या मागील बाजुस प्रेमचंदनगर भागातील चेतन पाटील यांच्या मालकीचे दुमजली अपार्टमेंट आहे. याठिकाणी तळमजल्याची रुममध्ये असलेल्या कृष्णकुमार विभूती सिंग याच्या मालकीचे सत्यनारायण सिक्युरीटी फोर्स सुरक्षा एजन्सीचे ऑफीसमध्ये ते हजर असतांना एका अनोळखी इसमाने ऑफीसचा बंद दरवाजा नॉक केला. दरवाजा उघडला असता अज्ञात आरोपी याने कृष्णकुमार विभूती सिंग यांच्या डोळ्यात मिरचीची पावडर फेकून रुममध्ये येवून त्यांना धक्का देवून ऑफीसमधील सोन्याची चैन, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण एक 13 हजार 15 रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !