गिरडगावच्या तिघांविरुध्द यावल पोलिसात वीज चोरीचा गुन्हा दाखल


यावल (25 ऑगस्ट 2024) : यावल तालुक्यातील गिरडगाव येथे राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने वीज चोरी विरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. यावेळी तिघे वीज चोरी करतांना आढळल्याने त्यांना वीवज युनिट नुसार दंड आकारून नोटीस देण्यात आली मात्र तिघांनी दंड न भरल्याने त्यांच्याविरोधात शनिवारी वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दंड न भरल्याने गुन्हा दाखल
गिरडगाव येथे किनगाव येथील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कक्षाचे सहायक अभियंता पंकज विकास कांबळे यांच्यासह पथकाने 25 फेब्रुवारी 2021 रोजी वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवली. त्यांना भिका ताराचंद सोनवणे, संभाजी राघो पाटील व आत्माराम ओंकार पाटील हे तिघे वीज चोरी करतांना आढळले. या तिघांनी 678 युनिट विजेची चोरी केल्याने त्यांना 17 हजार 980 रुपये दंड आकारून दंड भरण्यासाठी नोटीस देण्यात आली मात्र या तिघांनी वेळेत दंड न भरल्याने त्यांच्याविरोधात यावल पोलीस ठाण्यात पंकज कांबळे यांच्या फिर्यादीवरून तिघां विरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !