यावल-चोपडा रस्त्यावर दुचाकीला दुचाकीची धडक : वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी


Two-wheeler collides with two-wheeler on Yaval-Chopda road: Elderly couple seriously injured यावल (31 ऑगस्ट 2024) : यावल-चोपडा रस्त्यावर वढोदा गावाजवळ दुचाकीवर जात असलेल्या वृद्ध दाम्पत्याला एकाने मागून दुचाकीची धडक दिली. या अपघातात वृद्ध दाम्पत्य जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. दोघांवर येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी घडला.

अपघातानंतर वाहन चालक पसार
यावल शहरात बँकेतील ई केवायसी करण्यासाठी जनार्धन प्रल्हाद नारखेडे (65) व आशाबाई जनार्दन नारखेडे (60ा दोघे राहणार डांभुर्णी) हे दाम्पत्य आले होते. शुक्रवारी काम आटोपून सायंकाळी ते दुचाकी (क्रमांक एम.एच.19 ए. बी. 1299) द्वारे डांभुर्णी गावी परत जात असताना यावल शहराच्या बाहेर चोपडा रस्त्यावर वढोदा गावाजवळ त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगात येणार्‍या दुचाकी (क्रमांक एम.एच. 19 ए. झेड. 8810) वरील चालकाने धडक दिली. या अपघातामध्ये जनार्दन नारखेडे आणि अशाबाई नारखेडे यांना जबर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करीत आणण्यात आले.

रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे, डॉ. कोमल नरवाडे-पाटील, डॉ.अनुजा चालक, अधिपरिचारिका आरती कोल्हे, ज्योत्स्ना निंबाळकर, संजय जेधे आदींनी त्यांच्यावर प्रथमउपचार केलेफ दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचार करिता तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !