50 हजारांची खंडणी उकळणार्‍या तोतया अन्न औषध अधिकार्‍यांना कोठडी


यावल (6 सप्टेंबर 2024) : यावल तालुक्यातील चिंचोली गावातील दुकानदाराकडून अन्न औषध खात्याचे अधिकारी असल्याचे सांगत खंडणी घेणार्‍या दोन संशयीतांची गुरुवारी पोलिस कोठडी संपली व त्यांना भुसावळ येथील न्यायालयात हजर केले असता दोघांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

संशयीतांची कोठडीत रवानगी
चिंचोली, ता.यावल येथील दुकानदारांकडून संतोष बडगुजर यांच्या दुकानात विमल गुटखा विक्री केला जातो व आम्ही अन्न औषध विभागाचे अधिकारी आहोत, असे सांगत संशयीत आकाश भगवान जावरे (29, रा.आंबेडकर चौक, नंदुरबार) व राहुल श्रीहरी काळे (43, रा.कात्रज, पुणे) या दोघांनी 50 हजाराची खंडणी घेतली होती. तदोघांची गुरूवारी पोलीस कोठडी संपली असता दोघांना भुसावळ येथील न्यायालयात न्या.एस.व्ही.जंगमस्वामी यांच्या समोर हजर केले असता त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !