रावेर शहरात घरफोडीत 22 हजाराचा ऐवज लांबवला


रावेर (7 सप्टेंबर 2024) : रावेर शहरातील श्रीकृष्णनगरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने 22 हजारांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर फोडले
रावेर शहरांतील श्रीकृष्णनगरात प्रवीण सीताराम महाजन यांचे बंद घराचे कुलूप गुरुवारी रात्री चोरट्यांनी फोडत घरात प्रवेश केला. घरातील चांदीचे पैंजन, चांदीच्या पाटल्या, चांदीचे जोडवे, सोन्याचे मणी असा एकूण 22 हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबवला. प्रवीण महाजन यांनी फिर्याद दिल्यावरून रावेर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार ईश्वर चव्हाण करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !