हॉटेलचे बिल देण्याच्या वादातून भुसावळात एकावर हल्ला : दोघांना अटक


भुसावळ (10 सप्टेंबर 2024) : शहरातील हॉटेल चाहेलवर बिल देण्याच्या वादातून एकावर पाच ते सहा संशयीतांनी हल्ला केल्याची घटना 8 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात संशयीत अजीमसह सहा अनोळखींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आजीम शेख व भूषण होंडाळे यांना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

बिल देण्यावरून झाला वाद
समाधान अशोक निकम (33, आंबेडकर नगर, रेल्वे हॉस्पीटलमागे, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, 8 सप्टेंबर रोजी रात्री ते मित्रांसह नागपूर महामार्गावरील हॉटेल चाहेलवर जेवणासाठी गेले असता संशयीतानी बिल देण्याच्या कारणावरून वाद घातला. संशयीत अजीम शेखसह त्याच्या साथीदारांनी लाकडी दांडा व लोखंडी रॉडने मारहाण करीत तक्रारदाराचा पाय फ्रॅक्चर केला तसेच डाव्या डोळ्यावर व दंडावरही दुखापत करण्यात आली. याप्रकरणी संशयीत अजीमसह त्याच्या साथीदारांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश धुमाळ करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !