दीपनगर उड्डाण पुलावर ट्रक दुभाजकाला धडकला
भुसावळ (10 सप्टेंबर 2024) : राष्ट्रीय महामार्गावरील दीपनगर उड्डान पुलावर सोमवारी पहाटे एक ट्रक महामार्गावरील दुभाजकाला धडकल्यानंतर महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. या अपघाताची तालुका पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
पहाटेच्या सुमारास अपघात
राष्ट्रीय महामार्गावरील दीपनगर येथील उड्डान पुलावर सोमवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास वरणगावकडे जाणारी ट्रक (ए.पी.07 टी.जे.2288) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही ट्रक थेट दुभाजकावर जाऊन धडकली. सुदैवाने यात कुणालाही ईजा झाली नाही. अपघात झाल्यावर सुमारे 15 मिनिटे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अपघातग्रस्त ट्रक पहाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताप्रकरणी काहीही नोंद झाली नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

