भुसावळातील तीन लाखांचे बनावट नोटा प्रकरण : संशयीतांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ
Bhusawla Rs 3 lakh fake note case: Suspect’s custody extended by two days भुसावळ (11 सप्टेंबर 2024) : शहरातील नाहाटा चौफुलीजवळ बाजारपेठ पोलिसांनी बुधवार, 4 सप्टेंबर रोजी तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. या प्रकरणात तीन संशयीतांना अटक केली होती. तिन्ही संशयीतांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
खर्या नोटांच्या बदल्यात बनावट नोटा वितरीत होत असल्याची माहितीवरून बाजारपेठ पोलिसांनी सापळा रचून नाहाटा चौफुलीवरून तिघांना अटक केली. संशयीताना सुरूवातीला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्यांना पुन्हा मंगळवारी न्यायालयात हजरकेले असता दोन दिवसांची पुन्हा पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहे.

अजून बनावट नोटा मिळण्याची शक्यता
पोलिसांनी न्यायालयास सांगितले की, या प्रकरणातील अजून दोन संशयीत अटक करावयाचे असून या संशयीतांकडून पुन्हा 50 हजार रुपयांच्या नोटा मिळून आल्या आहे. यामुळे अजून नोटा असण्याची शक्यता असल्याने पोलीस कोठडी मिळावी. संशयीत सैय्यद मुशाईद अली मुमताज अली (38, रा.उस्मानिया पार्क, शिवाजीनगर, जळगाव), नदीम खान रहीम खान (35, रा.सुभाष चौक, शनिपेठ, जळगाव), अब्दुल हमीद कागल (57, रा.रसलपुर रोड, अब्दुल हमीद चौक, रावेर) या संशयीतांना बनावट नोटा प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
