गणेशोत्सव-ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर भुसावळातील 41 जणांना शहरबंदी
41 people in Bhusawal under city ban in view of Ganeshotsav-Eid e Milad भुसावळ (11 सप्टेंबर 2024) : भुसावळ शहरासह ग्रामीण भागातील 41 जणांना अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी शहरबंदीचे आदेश काढल्याने उपद्रवींच्या गोटात खळबळ उडाली आहे. गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभुमीवर पोलीस प्रशासनातर्फे अपर पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रस्ताव पाठविले. त्यावर नखाते यांनी निर्णय दिला.
18 सप्टेंबरपर्यंत शहर व गाव बंदी
गणेशोत्सवाच्या काळात शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधी राहण्यासाठ पोलीस प्रशासनातर्फे शहरातील उपद्रवी यांना गणेशोत्सवाच्या काळात शहरबंदीचे प्रस्ताव तयार करून अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांना पाठविण्यात आले. या प्रस्तावावर नखाते यांनी निर्णय देत 18 सप्टेंबरपर्यंत उपद्रवींच्या शहरबंदीचे आदेश काढले. यात शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 17, बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 20 आणि तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 4 मिळून 41 जणांना 18 सप्टेबरपर्यत शहरबंदी, गावबंदी करण्यात आली.

संबंधितांना बजावले आदेश
डीवायएसपी कृष्णात पिंगळे, शहर पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे, बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ, तालुका निरीक्षक महेश गायकवाड यांच्याकडून संबधितांना शहरबंदी, गावबंंदीचे आदेश बजाविण्यात आले. शहरबंदीत कुण्याही राजकीय पदाधिकार्यांचा समावेश नाही. गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या सणांच्या पार्श्वभुमीवर पोलिसांकडून ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आाल्याचे डीवायएसपी पिंगळे यांनी सांगितले.
