भुसावळात वकिलाचे घर फोडले : दुचाकीसह 93 हजारांचा ऐवज लांबवला
A lawyer’s house was broken into in Bhusawal : compensation of 93 thousand was extended along with a two-wheeler भुसावळ (11 सप्टेंबर 2024) : शहरातील खडका चौफुलीजवळील रेणूका माता मंदिराजवळील रहिवासी अॅड.श्याम श्रीगोंदेकर यांचे बंद घर चाोरट्यांनी 5 ते 7 सप्टेंबर काळात फोडून घरातील ज्युपीटर मोटर सायकल, टीव्ही, चांदीचे नाणे घड्याळ मिळून सुमारे 93 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लांबविला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
भुसावळात चोरटे सुसाट
रेणूका माता मंदिराजवळ राहात असलेले अॅड.श्याम श्रीगोदेकर हे नाशिक गेले असतांना त्याच्या बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. घरातील 80 हजार रूपये किंमतीची ज्युपीटर मोटरसायकल, 500 रुपये किंमतीचे घड्याळ, 10 हजार रुपये किंमतीचा एलईडी टीव्ही, तीन हजार रुपये किंमतीचे चांदीचे नाणे असा एकूण 93 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरांनी लांबविला. याप्रकरणी सोमवारी येथील बाजारपेठ पोलिसात अॅड.गोंदेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय नेरकर करीत आहेत.

