‘कॅडबरी डेअरी मिल्क’ खाताय मग ही बातमी नक्की वाचाच !
पुणे (23 सप्टेंबर 2024) : कॅडबरी लहान्यांपासून मोठ्यापर्यंतच्या सर्वांची आवडीची बाब मात्र पुण्यात एका ग्राहकाने मागवलेल्या कॅडबरी चॉकलेटमध्ये चक्क अळ्या आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्याहून विशेष म्हणजे कंपनीने या ग्राहकाला दिलेले उत्तर संतापात अधिक भर टाकणार आहे. ‘पुढच्या वेळेस अशी घटना घडल्यास आमच्या पत्त्यावर ती कॅडबरी पाठवा’ असे बेजवाबदार उत्तर ग्राहकाला तक्रारीत देण्यात आल्याने ग्राहकाने याबाबतचा व्हिडिओ एक्स वर पोस्ट केला आहे.
काय घडले नेमके ?
पुण्याील अक्षय जैन यांनी ‘कॅडबरी टेंप्टेशन्स रम आणि मनुका प्रीमियम चॉकलेट बार’ ही कॅडबरी मागवली होती. त्यांनी ती खाण्यासाठी रॅपर उघडले असता त्यामध्ये दोन अळ्या दिसल्या. त्यानंतर अक्षय जैन यांनी त्याबाबतचे फोटो आणि व्हिडीओ कंपनीला पाठवत नाराजी व्यक्त केली. या प्रकरणावर कॅडबरीने प्रतिक्रिया देताना म्हटले की,‘आम्हाला खेद आहे की आमच्या उत्पादनांमध्ये असा अनुभव आला. कृपया भविष्यात असे काही आढळल्यास, आम्हाला ते चॉकलेट आणि त्यामध्ये सापडलेले पदार्थ पाठवण्यास विसरू नका. आम्ही याबाबत योग्य तपास करून तुमच्या समस्येचे निराकरण करू.’


ही तर ग्राहकांसाठी धक्कादायक बाब
कंपनीच्या या उत्तरावर अक्षय जैन यांनी नाराजी व्यक्त करत, ‘कॅडबरी चॉकलेटची गुणवत्ता आणि सुरक्षितता यावर विश्वास ठेवणार्या ग्राहकांसाठी ही एक धक्कादायक घटना आहे.’ असे मत व्यक्त केले आहे.
यानिमित्ताने पुन्हा एकदा खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि एक्स्पायरी डेटचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. ग्राहकांनी खरेदी केलेल्या उत्पादनांवर तसेच त्यांच्या एक्स्पायरी दिनांक यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. दरम्यान, ‘लोकमत’ने याबाबत ऑनलाईन वृत्त दिले आहे.
