विकास कामातून भुसावळ शहराचा कायापालट : आमदार संजय सावकारे

शहरातील प्रभाग सातमध्ये पन्नास लाखांच्या कामांचे भूमिपूजन


Transformation of Bhusawal city through development work: MLA Sanjay Savkare भुसावळ (04 ऑक्टोबर 2024) : भुसावळ शहरातील विविध भागातील नागरिकांच्या मागणीनुसार आवश्यक असलेले सिमेंट रस्ते, डांबरीकरण, खडीकरण, सामाजिक सभागृह व धार्मिक स्थळांची अनेक विकासात्मक कामे पूर्णत्वास जात असून नव्याने अनेक कामे मंजूर आहेत. या विकासकामातून भुसावळ नगरीचा कायापालट होत असल्याचे प्रतिपादन भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी येथे केले. गुरुवार, 3 रोजी शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये भुसावळचे विधानसभेचे आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते सुकदेव पाटील नगर परिसर व मोहित नगर परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

शहराचा होतोय कायापालट
भुसावळातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पदपथ, रस्ते, उड्डाणपूल यांचे सुशोभीकरण, आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण या सर्व कामांमुळे भुसावळ शहर बदलत आहे. भुसावळातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. भुसावळकरांच्या कल्याणासाठी आगामी काळात आणखी जलदगतीने विकासकामे करण्याची ग्वाही यावेळी आमदार सावकारे यांनी दिली.


सपकाळे दाम्पत्याचे कार्य कौतुकास्पद
प्रभाग क्रमांक सातच्या नगरसेविका अनिता सतीश सपकाळे व भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे या दाम्पत्याच्या पाठपुराव्याने प्रभागात अनेक विकासकामे झाली असून यापुढेही विकासकामांची घौडदोड कायम राहिले व या दाम्पत्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे आमदार यावेळी म्हणाले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष युवराज लोणारी, भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, माजी नगरसेवक पुरुषोत्तम नारखेडे, अ‍ॅड.बोधराज चौधरी, पिंटू ठाकूर, गुणवंत बोरोले, अजय नागराणी, राहुल तायडे, प्रा.धीरज पाटील, पंकज इंगळे, सागर वाघोदे, अमोल पाटील, प्रकाश पवार, तुषार लाम्हणे, अमोल झटकार, कैलास पाटील व परिसरातील महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. परिसरातील नागरिकांनी आमदार सावकारे यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन प्रभाग क्र.7 च्या नगरसेविका अनिता सतीश सपकाळे व भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे यांनी केले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !