मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आजचे कार्यक्रम व मंत्री मंडळ बैठक केली रद्द : ‘हे’ कारण आले समोर


मुंबई (08 ऑक्टोबर 2024) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मंगळवारचा सोलापूर दौरा पुन्हा एकदा रद्द झाला असून पाचव्यांदा हा दौरा रद्द करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून मंगळवरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले तर महत्त्वाची मंत्री मंडळाची बैठकही रद्द करण्यात आली.

सर्व नियोजित कार्यक्रम रद्द
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचे आजचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या निवासस्थानी असल्याची माहिती मिळत आहे. प्रकृती ठिक नसल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला सोलापूर दौरा रद्द केला तसेच आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठकही पुढे ढकलण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आजची मंत्रिमंडळाची बैठक महत्त्वाची मानली जात होती.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सकाळी साडेअकरा वाजता मुंबई विमानतळावरून सोलापूर शहरात होणार्‍या वचनपूर्ती सोहळ्यासाठी जाणार होते. हा कार्यक्रम आज साडेबारा वाजता होणार होता व त्याची संपूर्ण तयारी देखील प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांची तब्येत अचानक बिघडल्याने हा दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता हा कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होण्याची शक्यता आहे.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !