वरणगावातील 82 कोटींच्या भुयारी गटार प्रकल्पास तांत्रिक मान्यता

वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांची माहिती


Technical approval for 82 crore underground sewerage project in Warangaon वरणगाव (08 ऑक्टोबर 2024) : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नातून वरणगाव शहरातील 82 कोटींच्या भूमिगत गटार प्रकल्पास मंगळवार, 8 ऑक्टोबरला तांत्रिक मान्यता मिळाल्याची माहिती वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली.

प्रशासकीय मान्यता मिळवून देणार : मंत्री महाजन
वरणगाव शहरात नवीन पाणीपुरवठा व्हावी व त्याबरोबरच भूमिगत गटार प्रकल्प व्हावा अशा प्रकारची मागणी तत्कालीन नगराध्यक्ष सुनील काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात तत्कालीन मंत्री गिरीश महाजन व आमदार संजय सावकारे व प्रशासनाकडे केली होती. हा प्रकल्प होण्यासाठी अनेकवेळा नगर परिषदेत आंदोलने झाली तसेच जिल्हाधिकार्‍यांकडे बैठका झाल्या होत्या. प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर संपूर्ण शहरातील गटारीचे पाणी हे भूमिगत गटारीद्वारे एसटीपी केंद्रापर्यंत पोहोचेल व ते पाणी शुद्ध होऊन पुढील वापरासाठी देण्यात येईल. प्रशासकीय मान्यतेसाठी मी प्रामाणिक प्रयत्न करतो, असे सुद्धा ग्राम विकास मंत्री महाजन म्हणाल्याचे सुनील काळे कळवतात. मंत्री महाजन, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्याधिकारी सचिन राऊत, तत्कालीन मुख्याधिकारी समीर शेख यांचे काळे यांनी आभार मानले आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !