भुसावळ शहरातील 21 वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग : कुविख्यात गुन्हेगाराला अटक
21-year-old girl assaulted in Bhusawal city : Notorious criminal arrested भुसावळ (14 ऑक्टोबर 2024) : भुसावळ शहरातील एका भागातील 21 वर्षीय तरुणीच्या घरात संशयीताने अनधिकृतपणे प्रवेश करीत अतिप्रसंग केल्याची घटना 10 रोजी रात्री तीन वाजता घडली. याप्रकरणी संशयीत शेख कलीम शेख सलीम (दीनदयाल नगर, भुसावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.
आरोपीची कोठडीत रवानगी
शहरातील एका भागात पीडीता कुटूंबासह वास्तव्यास असून आरोपी शेख कलीम याने 10 रोजी रात्री तीन वाजता तिच्या घरात अनधिकृतरीत्या प्रवेश पीडीतेच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. पीडीतेने बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यावरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यास अटक करण्यात आली. संशयीताला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर संशयीताची कारागृहात रवानगी करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहेत.

