जेलमध्ये शिजला कट : बाबा सिद्दीकी प्रकरणात तीन शुटरने झाडल्या सहा गोळ्या
Cooked conspiracy in jail : Six bullets fired by three shooters in Baba Siddiqui case मुंबई (14 ऑक्टोबर 2024) : मुंबईत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव समोर असून सूत्रांच्या माहितीनुसार पटीयाला जेलमध्ये हत्येचा कट रचण्यात आला व त्यासाठी तीन शूटर हायर करण्यात आले. आरोपींनी चार आठवडे रेकी केल्यानंतर हत्या केल्याचे समोर आले आहे. पटियाला जेलमधील लॉरेन्स बिश्नोई गँगच्या काही लोकांनी बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट रचला होता. हत्येच्या कटात मोहम्मद झिशान अख्तरचे नाव पुढे आलं होतं. त्याने हे सर्व प्लॅनिंग केले.
तीन संशयीतांना अटक :अन्य दोघे पसार
गुरमेल सिंह, धर्मराज कश्यप आणि शिव कुमार यांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला होता. यापैकी धर्मराज आणि गुरमेलला अटक करण्यात आली आहे, तर झिशान, शुभम लोणकर आणि शिव कुमार फरार आहेत. त्यानंतर प्रवीण लोणकरलाही पोलिसांनी अटक केली. प्रवीण आणि शुभम हे भाऊ आहेत.

जेलमध्ये रचला कट
21 वर्षीय झिशानला जालंधर पोलिसांनी 2022 मध्ये हत्या आणि दरोड्याच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर तो पटीयाला जेलमध्ये असताना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या काही लोकांना भेटला, ज्यांनी त्याला बाबा सिद्दिकी यांना मारण्याची सुपारी दिली. 7 जून 2024 रोजी तुरुंगातून बाहेर आल्यावर झिशानने हरियाणातील कैथलमध्ये गुरमेल सिंह यांची भेट घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झिशानच गुरमेल, धर्मराज कश्यप आणि शिव कुमार यांना सिद्दिकी यांच्या हत्येचा कट रचण्याचे निर्देश देत होता.
ज्यावेळी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळी झाडण्यात आली. तेव्हा झिशानच शूटर्सना सिद्दीकींच्या लोकेशनची माहिती देत होता. शूटर्सना भाड्याने खोली देण्यापासून ते इतर सर्व व्यवस्था त्यानेच केली होती. हत्या करण्याआधी चार आठवड्यांपासून हे लोक सिद्दिकी यांच्या घराची आणि मुलाच्या कार्यालयाची रेकी करत होते. ते जवळपास 40 दिवस मुंबईत राहिले.
