सर्वच ठिकाणी भ्रष्टाचार ही सत्ताधार्‍यांची निती : शरद पवार

पवार उवाच : ‘हे म्हातारं’ महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसत नाही


Corruption is policy of rulers everywhere : Sharad Pawar फलटण (14 ऑक्टोबर 2024) : यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना गेट वे ऑफ इंडियाजवळ शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. आज 70 वर्षे होऊन गेली, वारा प्रचंड असताना त्या पुतळ्याला धक्का बसला नाही आणि इथं शिवाजी महाराजांचा पुतळा हा उद्ध्वस्त होतो? त्याचे चार तुकडे होतात. याचं कारण पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला. तो भ्रष्टाचार सगळ्या ठिकाणी करणं, ही आजच्या राजकर्त्यांची नीती आहे. त्यांच्या हातातून सत्ता काढून घेणं, हेच काम तुम्हाला आणि मला, सगळ्यांना करायचं आहे. तेच काम सबंध महाराष्ट्रात फिरून आम्ही लोक करत असल्याचा घणाघात शरद पवार यांनी केला. फलटणमधील कार्यक्रमात ते बोलत होते.

महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणणार !
फलटणमध्ये अजित पवार गटातील संजीवराजे नाईक निंबाळकर आणि दीपक चव्हाण यांचा शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये शरद पवार येत असताना काही तरूण बोर्ड घेऊन थांबले होते त्यावर 84 वर्षांचा म्हातारा असा उल्लेख होता. हे शरद पवारांनी पाहिल्यानंतर वय कितीही झालं तरी थांबणार नाही, असे म्हणत त्यांनी निर्धार व्यक्त केला.


तुमच्या सगळ्याची मदत होणार
शरद पवार म्हणाल की, काही तरुण मुलं माझा बोर्ड घेऊन उभे होते. माझा फोटो होता आणि त्याच्यावर लिहिलं होतं, 84 वर्षांचा म्हातारा. तुम्ही काही काळजी करू नका. अजून लांब बघायचं आहे. 84 होवो, 90 होवो… हे म्हातारं काही थांबत नाही. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. तु्म्ही त्याची काळजी करू नका. या सगळ्या कामाला तुम्हा सगळ्यांची मदत अंतःकरणापासून होईल. याची खात्री मी बाळगतो, असे भाष्य शरद पवारांनी केले.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !