भुसावळातील कचरा तक्रारींचे 24 तासात होणार निरसन : मुख्याधिकारी राजेंद्र फातले


भुसावळ (18 ऑक्टोबर 2024) : शहरातील विविध भागात पालिकेच्या वतीने कचरा संकलीत करण्यासाठी घंटागाड्या सुरू करण्यात आल्या आहेत मात्र अनेकदा काही भागातील कचरा वेळेत उचलला जात नसल्याच्या तक्रारी येतात मात्र नागरिकांनी पालिकेच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यास 24 तासांच्या आत तक्रारींचे निरसन केले जाईल, असे मुख्याधिकारी राजेंद्र फातले म्हणाले.

24 तासात तक्रारींचे निरसन
भुसावळ पालिकेने शहरातील विविध भागातील कचरा संकलीत करण्यासाठी घंटागाडी सुरू केल्या आहेत मात्र नागरिक अनेकदा आपल्याकडील कचरा उघड्यावर टाकत असल्याने अनेकदा कचर्याचे ढीग जमा होतात व दुर्गंधी पसरून आरोग्य धोक्यात येते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कचर्या संदर्भात तक्रार असल्यास 8282821074 / 8282822074 या क्रमांकावर संपर्क साधावा व तक्रारी मिळताच पालिका या तक्रारीचे 24 तासांच्या आत निरसन करेल, अशी माहिती मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी दिली.


कॉपी करू नका.