समाधानी आणि अर्थपूर्ण जीवन जगणे ही खरी कला : भुसावळात प्रा.डॉ.बी.जे.मुंढे


भुसावळ (बुधवार, 12 ऑगस्ट 2026) : माणसाने आधुनिक युगातील बदल ताण-तणाव स्पर्धा आणि तंत्रज्ञान यांच्यात संतुलन साधून आनंदी व अर्थपूर्ण जीवन जगावे. आजचे युग विज्ञान, तंत्रज्ञान व वेगवान जीवन शैलीचे आहे. माणसांच्या सुख-सोयी वाढल्या असल्या तरी मानसिक ताण, स्पर्धा, एकटेपणा यासारख्या समस्या वाढताना दिसतात त्यामुळे केवळ यशस्वी होणे नव्हे तर समाधानी आणि अर्थपूर्ण जीवन जगणे ही खरी कला असल्याचे विचार शहरातील अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघात प्रा.डॉ.बी.जे.मुंढे यांनी व्यक्त केले. मानवी जीवन जगण्याची कला, आधुनिक युगातील चिंतन या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले.

यांची होती उपस्थिती
अष्टभूजा ज्येष्ठ नागरिक संघाची साप्ताहिक सभा संघाध्यक्ष अलका ढाके यांच्या अध्यक्षतेखाली नवशक्ती आवारात पार पडली. संघाचे जेष्ठ सदस्य गोपाल तिवारी व दिनकर बेंडाळे आणि प्रमुख वक्ते प्रा.मुंडे यांनी अष्टभुजा देवी मातेच्या प्रतिमेचे पूजन केले. सभेची सुरुवात कुसुम पाटील यांनी रामनाम जपाने केली. विश्वप्रार्थना व परमपूज्य श्री गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन वाचन अलका अहिराव यांनी केले. संघाचे जेष्ठ सदस्य सुरेश कुरुंबट्टी यांनी प्रमुख वक्ते प्रा.मुंडे यांना आमंत्रीत केले . संघ अध्यक्षा अलका ढाके यांनी भेटवस्तू देऊन सरांचे स्वागत सत्कार केला व त्यांचा परिचय सुरेश कुरंभट्टे यांनी करून दिला.




सहकार्याची भावना ठेवल्यास जीवन समृद्ध
प्रा.मुंढे म्हणाले की, आधुनिक माणसाने स्वतःला ओळखणे आवश्यक आहे. आपल्या क्षमता, अमर्यादा गरजा याची जाणीव असणे गरजेचे असून इतरांशी सतत तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगती कडे लक्ष दिल्यास आत्मविश्वास वाढतो. तंत्रज्ञानाच्या वापराने माणसाचे जीवन सोपे झाले म्हणून माणूस तंत्रज्ञानाचा गुलाम होऊ नये ही आधुनिक जीवनाचे महत्त्वाचे कला आहे. कुटुंबीय मित्र आणि समाज यांच्याशी प्रेम, संवाद आणि सहकार्याची भावना ठेवली पाहिजे तर जीवन अधिक समृद्ध होईल.

आभार प्रदर्शन ज्ञानदेव इंगळे यांनी मानले. पसायदान व राष्ट्रगीताने ज्ञानेश्वर गव्हाळे यांनी सभेची सांगता केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !